अमित शहा हा तु्मचा जोडधंदा आहे का? अनुराग कश्यप यांचा गृहमंत्र्यांना टोला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

दिग्दर्शक अनुराग कश्यपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका अश्लील ट्विटवरुन 'हा तुमचा जोडधंदा आहे का?' असा प्रश्न ट्विट करत विचारला आहे.

नवी दिल्ली : दिग्दर्शक अनुराग कश्यपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका अश्लील ट्विटवरुन 'हा तुमचा जोडधंदा आहे का?' असा प्रश्न ट्विट करत विचारला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा मिळावा म्हणून भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या टोल फ्री क्रमांकाच्या मोहिमेवरुन भाजपची चांगली खिल्ली उडवली जात आहे. यामध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही उडी घेत थेट केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनाच प्रश्न केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटवरुन ८८६६२८८६६२ या टोल फ्री क्रमांकांवर मिस कॉल देऊन तुमचा पाठिंबा द्या असं आवाहन करणारं ट्विट केलं होतं. मात्र हा क्रमांक वापरुन एकाने मोफत सेक्ससाठी शहरामध्ये ६९ जण उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी या क्रमांकावर फोन करा असं म्हणत ट्विट केला होता. या दोन्ही ट्विटचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने शाह, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि भाजपवर टीका केली आहे. अमित शाहजी एकच क्रमांक दोघांकडे आहे. हा तुमचा जोडधंदा आहे का. की नेहमीप्रमाणे अमित मालवीय आणि भाजप लोकांना मुर्ख बनवत आहे, असा प्रश्न अनुराग कश्यपने हे दोन्ही स्क्रीनशॉर्ट शेअर करत केला आहे.

ठाकरे आडनाव नसतं, तर राज ठाकरे...; 'या' मंत्र्यांने केली टीका

तत्पूर्वी, केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA)देशभरातून विरोध होताना दिसत आहे. अशात भाजप पुरस्कृत संघटनांकडून काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी या कायद्याला पाठिंबा देणारे मोर्चे निघाल्याचं पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या कायद्याला भारतीयांचा पाठिंबा मिळावा म्हणून भाजपाने टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तुमचा पाठिंबा नोंदवा ही मोहिम सुरु केली होती. मात्र यावरून अनेकांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. विरोधीपक्षांबरोबरच नेटकऱ्यांनाही या मोहिमेवरुन भाजपवर टीका केली आहे. अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी हा क्रमांक व्हायरल केला. काहींनी तर चक्क हा क्रमांक फ्रेण्डशीप क्लब वगैरेचा क्रमांक असल्याचे ट्विट करत भाजपाची खिल्ली उडवली. काहींनी हा ऑफर मिळवण्यासाठी तर काहींनी नेटफ्लिक्सशी संबंधित असल्याचे ट्विट केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dear Amit Shah is this your side business? Anurag Kashyap mocks BJP