esakal | COVID_19 मुळे जीव गमावणाऱ्या जवानांना दिला जाणार कोरोना हुतात्मा दर्जा; अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

 CoronaVirus, Indian Army,Corona,Corona Martyr

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना योद्धाच्या रुपात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू ओढावणाऱ्या जवानाला कोरोना हुताम्ता हा दर्जा बहाल करण्यात येणार आहे.

COVID_19 मुळे जीव गमावणाऱ्या जवानांना दिला जाणार कोरोना हुतात्मा दर्जा; अन्...

sakal_logo
By
सुशांत जाधव

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जीव गमावणाऱ्या भारतीय सुरक्षा दलातील जवानांना कोरोना हुतात्मा असा दर्जा देण्यात येणार आहे. संबंधित हुतात्म्याच्या कुटुंबियांना भारत वीर निधीतून 15 लाख रुपयपर्यंत आर्थिक मदतही दिली जाईल. ही मदत विभागीय कार्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या मदतीव्यतिरिक्त स्वरुपात असेल. सुरक्षा दलाने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला प्रस्ताव पाठवला असून याला मंजूरी मिळताच जवानांसाठी ही नवी नियमावली लागू करण्यात येईल. कोरोनामुळे मृत जवानांची आकडेवारी वीर पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येत आहे. जवानांच्या कुटुंबियांना थेट मदत मिळावी यासाठी यात बँक खाते आणि अन्य माहितीही देण्यात आली आहे. वीर जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी 'भारत के वीर कॉपर्स फंड' योगदाना देणे शक्य आहे. 

कोरोनावरील उपायांचे स्वरूप व दिशा

2017 मध्ये वीर फंड संकल्पना सुरु करण्यात आली होती. देशाचे संरक्षण करताना धारातीर्थ पडणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याच्या उद्देशाने गृहमंत्रालयाच्या वतीने या फंडाची योजना सुरु करण्यात आली होती. यासाठी पोर्टल तयार करण्यात आले होते. यामुळे हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांपर्यंत थेट मदत पोहचवणे सुलभ झाले होते. या निधीमध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून  यूपीआयच्या माध्यमातून मदत करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना योद्धाच्या रुपात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू ओढावणाऱ्या जवानाला कोरोना हुताम्ता हा दर्जा बहाल करण्यात येणार आहे. जवानांच्या कुटुंबियांना भारत वीर फंड मधून आर्थिक मदत दिली जाईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी उभारण्यात आलेल्या निधीमध्ये  2017 मध्ये जवळपास 6.40 कोटी रुपये  जमा झाले होते. 2018 मध्ये यात आणखी भर पडल्याचे पाहायला मिळाले. मदत निधीतील आकडा हा 19.43 कोटींच्या घरात पोहचला. पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या  40 जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी या निधीमध्ये जवळपास 250 कोटी रुपये जमा झाले होते.  देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा वेगाने होताना दिसत आहे. वेगवेगळ्या सुरक्षा दलातील 39 जवानांनी कोरोनाची लागण झाल्यामुळे आपला जीव गमावला आहे. यात सीआरपीएफ 15, बीएसएफ 10, आयटीबीपी 3, सीआयएसएफ ९ आणि एसएसबीच्या दोन जवानांचा समावेश आहे. आतापर्यंत जवळपास  8113 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून 4512 जवानांनी कोरोनावर मात केली आहे.

loading image