Coronavirus : कोरोनाचा थैमान कायम; दीड हजार रुग्णांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

हुबेईत सर्वाधिक मृत्यू

बीजिंग : कोरोना व्हायरसची लागण झाल्याने चीनमध्ये आतापर्यंत सुमारे 1500 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. यातील मृतांचा आकडा सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चीनमधील हुबेई या भागातील जवळ 121 मृत्यूंची समावेश आहे. चीनमधील कोरोनाग्रस्त 65 हजारांवर गेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्हायरसमुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर आता चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले, की देशात कोरोनाचे नवे 5090 रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 64,894 झाली आहे.

हुबेईत सर्वाधिक मृत्यू

चीनमधील हुबेई प्रांतात 116 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हीलोंगजिंग प्रांतात आणि प्रत्येकी एक अन्हुई, हुनान आणि चॉन्गक्विंग प्रांतात झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death toll in China nears 1500 confirmed cases cross 65000