esakal | इंदिरा गांधींना अपात्र ठरवल्याचा निर्णय साहसी होता - सरन्यायाधीश
sakal

बोलून बातमी शोधा

CJI रमणा

इंदिरा गांधींना अपात्र ठरवल्याचा निर्णय साहसी होता - सरन्यायाधीश

sakal_logo
By
सुधीर काकडे

भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी प्रयागराजमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अलाहाबाद उच्चन्यायालयाच्या १९७५ मधील इंदिरा गांधी यांच्या संबंधीत निकालाबद्दल मोठं वक्तव्य केलं. १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगनमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींना अपात्र असल्याचा निकाल देऊन देशाला हादरवून सोडले होते. या एका निकालानंतर देशात थेट आणीबाणी लावण्याचा निर्णय घेतला गेला होता. इंदिरा गांधींना अपात्र ठरवण्याचा मोठा आणि साहसी निकाल न्यायालयाने दिला होता असे सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितले. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे आज उत्तर प्रदेश राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभ समारंभासाच्या कार्यक्रमासाठी अलाहाबादमध्ये होते यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

अलाहाबादच्या न्यायालयाला १५० वर्षांचा मोठा इतिहास आहे. देशातील मोठे कायदे पंडित अलाहाबाद बार बेंचने तयार केले आहेत. संविधान सभेचे पहिले अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, पंडित मोतीलाल नेहरु, सर तेज बहादुर सप्रु आणि पुरुषोत्तम दास टंडन हे सर्वजण याच बार बेंचचेच असल्याचे सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितले. देशभरात गाजलेल्या चौरी चौरा प्रकरणात देखील याच पंडित मदन मोहन मालवीय यांच्याकडून अपील केले गेले होते. या बार बेंचने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि संविधान निर्मातीमध्ये मोठं योगदान दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा विजय निश्चित - नड्डा

पुढे बोलताना एन व्ही रमणा यांनी, मला अपेक्षा आहे की, इथुन पुढच्या काळात देखील या न्यायालयाची परंपरा आपण जपाल, या न्यायालयाचा वारसा आणि संस्कृती पुढे घेऊन जाल असे म्हणत आशा व्यक्त केली. सर्वसामान्य लोकांच्या अधिकारांचे, स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी तुम्ही महत्वाची भुमिका पार पाडावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

loading image
go to top