esakal | उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा विजय निश्चित - नड्डा
sakal

बोलून बातमी शोधा

jp nadda

उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा विजय निश्चित - नड्डा

sakal_logo
By
अमित उजागरे

लखनऊ : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मोठा विजय मिळेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे. लखनऊ येथे शनिवारी 'बुथ विजय अभियान' कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्यातील २७,००० बुथच्या कार्यकर्त्यांशी जे. पी. नड्डा यांनी व्हर्च्युअली संवाद साधला.

हेही वाचा: मराठमोळा व्यक्ती गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी? कोणती नावे आहेत चर्चेत?

नड्डा म्हणाले, "आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जातीचं, कौटुंबिक, घराणेशाही आणि जातीयवादी राजकारणाचा शेवट होत चालला आहे. तर विकासाचं मॉडेल प्रसिद्ध होत आहे."

हेही वाचा: खाद्य तेलांच्या किंमती होणार कमी; केंद्रानं घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

मोदींच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील २०१७ च्या निवडणुकीत भाजपनं ३२५ जागा जिंकून इतिहास रचला होता. सन २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या जनतेनं विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दिला. आताही भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता उत्तर प्रदेशचं भविष्य स्पष्टपणे दिसतंय, असंही यावेळी नड्डा म्हणाले. त्याचबरोबर नड्डा यांनी दावा केला की, सर्व प्रकारच्या सर्वेंमधून हे दिसून येतंय की, उत्तर प्रदेशात लोकांच्या आशीर्वादानं भाजपचा मोठा विजय निश्चित आहे. केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर उत्तराखंड, गोवा आणि मनिपूरमध्येही पुढील वर्षी भाजपचा मोठा विजय होईल.

हेही वाचा: ... म्हणून BJP नं विजय रुपाणींना बळीचा बकरा बनवलं: काँग्रेस

यावेळी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना नड्डा म्हणाले, आमच्याकडे असे राजकीय नेते आहेत जे संसदेचं अधिवेशन सुरु असताना परदेशात फिरायला जातात. कोरोनाच्या काळात भाजप सोडून इतर सर्व पक्षांचे नेते लॉकडाउन आणि क्वारंटाइन झाले होते. या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता गरजवंतांना मदत करत आपलं कर्तव्य बजावत होते.

loading image
go to top