साहित्यिक जी. नानजुंदन यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

वृत्तसंस्था
सोमवार, 23 डिसेंबर 2019

कर्नाटकातील प्रसिद्ध साहित्य अकादमी विजेते लेखक आणि संशोधक जी. नानजुंदन यांचा मृतदेह आज येथील त्यांच्या निवासस्थानी सडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली.

बंगळूर - कर्नाटकातील प्रसिद्ध साहित्य अकादमी विजेते लेखक आणि संशोधक जी. नानजुंदन यांचा मृतदेह आज येथील त्यांच्या निवासस्थानी सडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली. तूर्तास पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, डॉक्‍टरांचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असेही सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नानजुंदन यांनी बंगळूर विद्यापीठामध्ये सांख्यिकीशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनदेखील काही काळ अध्यापन केले होते. विविध नामांकित नियतकालिकांमधूनही त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decomposed body of sahitya akademi awardee dr G Nanjundan found