

Deendayal Antyodaya Rasoi Supports Poor Families With Affordable Full Meals at 5 Rupees and Tea at Just 10 Rupees
esakal
वाढत्या महागाईच्या काळात साधे जेवण करण्यासाठीही मोठा खर्च करावा लागतो. अनेक ठिकाणी एका कप चहासाठीही १० रुपये मोजावे लागतात. मात्र, मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात गरजू नागरिकांना केवळ ५ रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे. सतना बस स्थानकाजवळ सुरू असलेली ‘दीनदयाळ अंत्योदय रसोई’ गरीब, मजूर, असहाय नागरिक आणि परगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे.