esakal | गुजरातच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; बीडच्या तरुणाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

vijay rupani

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; बीडच्या तरुणाला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (बीड): गुजरात सायबर पोलिसांनी १५ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी (vijay rupani) यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकल्याबद्दल येथील २० वर्षीय तरूणाला अटक केली आहे. फैजल खान युसूफभाई याची शहरात मोबाईल शॉपी आहे. याने १५ एप्रिल २०२० रोजी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या बदल कोविड संदर्भात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पोस्ट करून व्हायरल केली होती. (gujarat cm vijay rupani gujarat police action beed)

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहमदाबाद शहर सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक के.के. मोदी यांनी मोबाईल शॉपी मालक फैसल खान युसुफभाई या तरूणाविरोधात तक्रार दाखल केली होती. १८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी (ता.२९) अहमदाबाद सायबर पोलिसांच्या पथकाने परळी गाठले आणि युवकाला नोटीस बजावली. त्याला चौकशी अधिकारी आणि सायबर निरीक्षक एम.एन. देसाई यांच्यासमोर शनिवारपूर्वी उपस्थित राहण्यास सांगितले.

हेही वाचा: आयएएस 'आंचल गोयल' नेमके कुणाला नको होत्या...?

त्यानुसार तरूणाने अहमदाबाद सायबर पोलिस ठाणे गाठले आणि तो पोलिसांना शरण आला. पोलिस निरीक्षक मोदी यांनी सांगितले की, तरूणाने तपास अधिकाऱ्यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

loading image
go to top