esakal | आयएएस 'आंचल गोयल' नेमके कुणाला नको होत्या...?
sakal

बोलून बातमी शोधा

aanchal goyal

आयएएस 'आंचल गोयल' नेमके कुणाला नको होत्या...?

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी: परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल (aanchal goyal ias) या तरूण महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली होती. परंतू त्या रुजू होण्याच आधीच त्यांची बदली रद्द करण्यात आली. त्यांची बदली का व कुणी रद्द केली याबाबत अद्यापही साशंकता आहे. सांयकाळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपवावा अशा आदेशाचे पत्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंत्रालयातून आले. त्यानंतर श्री.काटकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला.

आयएएस अधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील अनेकांच्या पोटात कळ उठली. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीपासून जिल्ह्यातील काही मंडळी त्यानी पदभार घेऊ नये यासाठी थेट मंत्रालयात धाव घेत श्रीमती गोयल यांना पदभार घेण्यापासून दुर ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले. या सर्व कारस्थानामध्ये ही मंडळी यशस्वी झाली. श्रीमती गोयल यांच्या ऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे हा पदभार द्यावा असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिले.

हेही वाचा: नितीन गडकरी मला तुमची मदत हवी आहे - मुख्यमंत्री ठाकरे

विशेष म्हणजे दिवसभरात या प्रकरणी चर्चा झडत होती. पत्रकारांनी थेट पालकमंत्र्यांनाही या बाबत विचारणा केली. त्यांनी ही याबाबत आपल्यास काही माहित नसल्याचे सांगत उत्तर देणे टाळले. विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार देण्याचे पत्र हे शुक्रवार ता. ३० जुलै रोजीचे आहे. सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यांच्या पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे सोपविला.

loading image
go to top