चीनला प्रत्युत्तर; फिलीपीन्स भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार I Brahmos | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmos

ब्रह्मोससाठी पहिल्यांदाच विदेशातून मागणी करण्यात आली आहे.

चीनला प्रत्युत्तर; फिलीपीन्स भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार

दक्षिण चीन (south china sea) समुद्रात आपली ताकद दाखवणाऱ्या चीनला सध्या मोठा झटका बसला आहे. चीनच्या या आक्रमक वृत्तीला तोंड देत असलेल्या फिलीपिन्सने भारतासोबत जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्र (ब्रह्मोस) च्या (Brahmos) खरेदीला मान्यता दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फिलिपाइन्सच्या (philippines) राष्ट्रीय संरक्षण विभागाने ब्रह्मोसच्या अधिकाऱ्यांना ही माहिती पाठवली आहे. ब्रह्मोससाठी पहिल्यांदाच विदेशातून मागणी करण्यात आली आहे. हा करार 374.9 दशलक्ष अमेरिकन (American Doller) डॉलर इतक्या किमतीला ठरला आहे.

चीन विरोधात भारतावर विश्वास ठेवा

या करारातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचा (America) मित्रदेश असणारा फिलीपिन्सने चीनविरुद्धच्या (China) लष्करी तयारीसाठी भारत-रशियाने (India-Russian) संयुक्तपणे बनवलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रा संदर्भात विश्वास दाखवला आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या तिप्पट म्हणजेच ताशी ४, ३२१ किलोमीटर वेगाने मारा करण्यास सक्षम आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी आज देशातील 150 स्टार्टअपशी संवाद साधणार

फिलीपिन्स चीन विरूद्ध किनारी भाग सुरक्षित करणार?

फिलिपाइन्सला सतत विविध क्षेत्रात आव्हान देणाऱ्या चीनला या कराराचा मोठा झटका बसला आहे. वास्तविक, दक्षिण चीन समुद्रात फिलीपिन्सच्या अधिकारक्षेत्रावरून चीनसोबत वाद सुरू आहे. एका अहवालानुसार, अशा परिस्थितीत फिलिपिन्स आपल्या किनारी भागात ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर देशांमधून खरेदीसाठी आदेश

सूत्रांच्या माहितीनुसार, डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) (DRDO) आणि ब्रह्मोस एरोस्पेस हे क्षेपणास्त्र मित्र देशांना निर्यात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डीआरडीओने नुकताच मेड इन इंडिया (Made in India Radar) रडारसाठी अमेरिकेसोबत करार केला होता. भारताला इतर मित्र देशांकडून क्षेपणास्त्र प्रणालीसाठी लवकरच आदेश मिळतील अशी अपेक्षा आहे. तसेच इतर काही संबंधित देशांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. या क्षेपणास्त्राची क्षमता वाढली असून ते अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज झाले आहे. चीनच्या शेजारील दुसरा देश व्हिएतनामही (Vietnam) भारताकडून ही क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्ये विजेच्या निर्मितीसाठी राज्यावर २ हजार कोटींचे कर्ज

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ChinaDRDODefence ministry
loading image
go to top