Home Loan
Home LoanSakal

लॉकडाऊनमध्ये विजेच्या निर्मितीसाठी राज्यावर २ हजार कोटींचे कर्ज

बँक ऑफ बडोदाच्या कर्जासह व्याजाच्या २ हजार ४६६ कोटींना हमी
Published on

नाशिक : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये (corona update nashik )राज्यातील विजेची दररोजची मागणी २३ हजार मेगावॉटवरुन(MSEDCL) १६ हजार मेगावॉट इतकी कमी झाली. तसेच ग्राहकांना सवलती देण्यात आल्या. त्यामुळे महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण कंपनीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतर्फे बँक ऑफ बडोदाकडून २ हजार कोटींचे कर्ज घेतले जाणार आहे. त्यावर पावणेसात टक्क्यांनी दरवर्षी व्याज द्यावे लागणार असून ही रक्कम ४६६ कोटी ९३ लाख होती. अशा एकूण २ हजार ४६६ कोटी ९३ लाखाच्या रकमेला शुक्रवारी (ता.१४) राज्य सरकारने हमी दिली.

Home Loan
अकोला : आर्थिक मदतीसाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज करा!

महानिर्मितीला (msdecl)कर्ज घेण्यासाठी हमीवरील शुल्क माफीला गेल्यावर्षी जूनमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाने(cabinet minister) मान्यता दिली आहे. पुढे कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीने गेल्या महिन्यात मान्यता दिली. सरकारने हमीवर कर्ज घेण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्‍चित करून दिला आहे. महानिर्मिती कंपनीकडून कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाल्यास दंड-व्याज आणि इतर कोणत्याही देण्यासाठी सरकार बांधील राहणार नाही. कर्जाच्या रकमेतून तयार होणारी मालमत्ता तारण म्हणून ठेवली जाणार आहे. एवढेच नव्हे, तर कर्ज(loan) परतफेडीमध्ये विलंब झाल्यास महानिर्मिती कंपनीच्या मालमत्ता विक्री, लिलावास सरकारने मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com