
भारतीय सेनेची ताकद वाढणार; सरकार खरेदी करणार नवीन फील्ड गन
नवी दिल्ली : भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराच्या (Indian Army) ताफ्यात आधूनिक शस्त्र, विमानं आदींची खरेदी करत असतो. याचा एक भाग म्हणून भारताला लागून असलेल्या चीन आणि पाकिस्तानच्या पर्वतीय सीमाभागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्याधूनिक तोफा खरेदी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने 105MM/37 कॅलिबर माउंटेड गन सिस्टीमच्या खरेदीसाठी RFI (रिक्वेस्ट फॉर इंफॉर्मेशन) जारी केले आहे. (Defense Ministry RFI For New Gun)
हेही वाचा: भाजप-मनसेची युती कधी होणार?, फडणवीस म्हणतात...
या RFI मध्ये नमूद केलेल्या मुख्य आवश्यकतांपैकी तोफांच्या चाचणी सध्या वापरात असलेला दारूगोळ्याचा वापर करू शकेल. ही गन सिस्टीम उत्तर सीमेवरील पर्वत आणि उच्च उंचीच्या भागात तैनात आणि वापरण्यास सक्षम असावी असेदेखील RFI मध्ये नमुद करण्यात आले आहे. त्याशिवाय रात्री आणि दिवसा काम करणारी अग्निशमन यंत्रणा असण्याचीदेखील मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा: इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यावर बंदी?, फेक बातमी असल्याचं आलं समोर
गन सिस्टीममध्ये अंगभूत चाचणी सुविधा (BITE) असणे आवश्यक आहे जेणेकरुन कोणतीही विसंगती सहज शोधता येईल आणि दुरुस्त करता येईल. बंदूक प्रणालीतील किमान 50 टक्के घटक स्वदेशी असावेत असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या भारतीय लष्कराकडे 60-70 च्या दशकातील 105MM/37 कॅलिबर माऊंटेड तोफा सेवा देत असून, आज घडीला भारतीय लष्कराकडे 100 हून अधिक 105MM/37 तोफा आहेत. परंतु, त्या खूप जुन्या झाल्या आहेत.
105MM/37 कॅलिबर माउंटेड गनचे खासियत
105MM/37 कॅलिबर माउंटेड गन बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती वजनाने हलकी आहे. उच्च उंचीच्या भागात ते सहजपणे तैनात केले जाऊ शकते. सध्या या गन भारतीय लष्कराकडून पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. या तोफांच्या मदतीने दिवसा आणि रात्री गोळीबार करता येणं शक्य आहे. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर लडाखमध्ये या तोफांची तैनाती वाढवण्यात आली आहे.
Web Title: Defense Ministry Releases Request For Information For New 105mm Field Guns For Indian Army
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..