इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यावर बंदी?, फेक बातमी असल्याचं आलं समोर I Fact Check | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यावर बंदी?, फेक बातमी असल्याचं आलं समोर

केंद्र सरकरानं बंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले होतं, मात्र..

इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यावर बंदी?, फेक बातमी असल्याचं आलं समोर

देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Scooter) आग लागण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सरकारनं इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना नवीन मॉडेल (दुचाकी) लाँच करण्यास बंदी घातल्याची बातमी समोर आली आहे. मात्र आता पीआयबीनं हे वृत्त फेक असल्याचे सांगितंले आहे. कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरची संपू्र्ण तपासणी केल्याशिवाय ती लॉन्च केली जात नसल्याचं कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरकरानं या गाड्यांचं लॉंचिंग थांबवलं असल्याची बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, देशात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढत असतानाच केंद्र सरकरानं बंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले होते. इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला असून अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिल्लीत एक बैठक घेतली असल्याचेही माहिती देण्यात आली होती. मात्र असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसुन या गाड्यांचे लॉंचिंग हे पूर्ण तपासणीनंतर होतं असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पीबीआयने दिलेल्या अहवालानुसार हे वृत्त खोटे आहे. ज्या कंपनी इलेक्ट्रीक टू व्हिलर तयार करतात त्यांच्याकडील अशा आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय आधी विक्री केलेल्या वाहनांवर त्यांनी सुधारीत सर्व उपाय योजना लागू केल्या आहेत. आणि अशा विक्री केलेल्या गाड्यांवर काम सुरु असल्याची माहिती या अहवालातून पुढे आली आहे.