"देख रहा है ना बिनोद..."; 'पंयायत'मधील जितूच्या मीमची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchayat

"देख रहा है ना बिनोद..."; 'पंयायत'मधील जितूच्या मीमची चर्चा

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडिओ प्रेरणादायी सुद्धा असतात. असाच पंचायत वेबसिरीजमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमेझॉनवर रिलीज झालेली पंचायत वेबसिरीज प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडली होती. त्यामध्ये सचिव जी नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

या सिरिजमध्ये ग्रामपंचायत सचिव अभिषेक त्रिपाठी आणि सरपंचांची मुलगी रिंकी यांच्यातील सुत जुळतााना पहायला मिळतात. त्याच गावातील एक गरीब व्यक्ती म्हणून दाखवलेल्या विनोद या व्यक्तीचे ग्रामपंचायत निधीतून मिळालेले टॉयलेटचे भांडे सचिवाकडून फुटलेले असते. त्यानंतर आता एक मीम व्हायरल होत असून त्यामध्ये विनोद आणि रिंकीचा सोबतचा फोटो आहे आणि विनोदचा व्हायरल झालेला डायलॉग "देख रहा है ना विनोद..." यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. सरपां

व्हायरल होत असलेल्या या मीमला नेटकऱ्यांच्या विनोदी प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर पंचायत या वेबसिरीजमध्ये गरिब माणूस दाखवलेल्या विनोदने सरपंचांच्या मुलीला पटवलं अशाही प्रतिक्रिया आल्या आहेत.

तुम बिनोद का टॉयलेट तोडेगा तो बिनोद तुम्हारा दिल तोडेगा

या सिरीजमध्ये सचिवाकडून बिनोदचे टॉयलेटचं भांडं तुटल्यामुळे बिनोदला उघड्यावर टॉयलेटला जावं लागलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्या सीनचा संदर्भ या मीमला जोडलं पाहिजे.

Web Title: Dekh Raha Hai Naa Binod Paanchayat Web Series Viral Meme Photo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Web Seriesviral post