Delhi Chief Minister resigns : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत आपचा पराभव करत भाजपाने २७ वर्षानंतर दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांसारख्या मोठ्या नेत्यांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.