Delhi: दोन विद्यार्थी संघटनांत ‘जेएनयू’मध्ये हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेएनयू

दोन विद्यार्थी संघटनांत ‘जेएनयू’मध्ये हाणामारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अभाविप आणि जेएनयूएसयू या प्रतिस्पर्धी विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांत रविवारी धुमश्चक्री झाली. ही माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. अद्याप प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. विद्यार्थी संघटना सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यावरून वादावादी झाली. यावरून जेएनयूएसयू (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुड्ंट््स युनियन) आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने (एआयएसए) याबाबात एक निवेदन जारी केले आहे.

त्यानुसार नेहरू जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी सभागृहाचे आरक्षण केले होते. त्याबाबत पोस्टरही लावण्यात आली होती. संयोजक विद्यार्थी सभागृहात गेले तेव्हा अभाविपच्या १५ कार्यकर्त्यांनी ते ठिकाण ताब्यात घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तेथून जावे असे समजावण्याचा प्रयत्न एआयएसएच्या कार्यकर्त्यांनी केला, मात्र अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर आमचे कार्यकर्ते सभागृहाबाहेर आले आणि त्यांनी अभाविपच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारामारी सुरु केली.

त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांनाही चोपून काढले. मग विद्यार्थी जमले आणि त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना निघून जाण्यास भाग पाडले. अभाविपने हा आरोप फेटाळून लावला.

loading image
go to top