CM केजरीवाल यांच्यासाठी तिहार तुरुंगात स्थापन केला मेडिकल बोर्ड; एम्सचे 5 डॉक्टर करणार तपासणी

CM Arvind Kejriwal : दिल्लीच्या तिहार जेलमधील डॉक्टर हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साखरेची पातळी दररोज तपासतात आणि निरीक्षण करतात. न्यायालयाच्या आदेशानुसार केजरीवाल यांना फक्त घरी बनवलेले जेवण दिले जात आहे.
CM Arvind Kejriwal
CM Arvind Kejriwal Esakal

दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी एम्सच्या 5 डॉक्टरांचे वैद्यकीय मंडळ तयार करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर 23 एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. निखिल टंडन वैद्यकीय मंडळाचे प्रमुख आहेत. त्यांना तिहार जेलच्या डीजींच्या पत्रावरून अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी एम्समधून आधीच नियुक्त करण्यात आले होते.

सोमवार 22 एप्रिलपासून अरविंद केजरीवाल यांना दररोज दुपारच्या जेवणापूर्वी 2 युनिट कमी डोस आणि रात्रीच्या जेवणापूर्वी 2 युनिट इन्सुलिन दिले जात आहे. अरविंद केजरीवाल यांनी अद्याप वैद्यकीय मंडळाची भेट घेतलेली नाही. लवकरच मेडिकल बोर्डाची टीम तिहार तुरुंगात जाऊन केजरीवालांची तपासणी करू शकते.

तिहार तुरुंगातील डॉक्टर अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल दररोज तपासतात आणि निरीक्षण करतात. न्यायालयाच्या आदेशानुसार सीएम केजरीवाल यांना फक्त घरचे जेवण दिले जात आहे. सध्या अरविंद केजरीवाल यांची प्रकृती ठीक आहे.

CM Arvind Kejriwal
Loksabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यासाठी आज ‘मतसंग्राम’; राज्यातील आठ मतदारसंघांत मतदान

तिहार जेलवर संजय सिंह यांचे आरोप

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी तिहार जेल हे टॉर्चर रूम बनले आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

CM Arvind Kejriwal
Salman Khan Firing Case : सलमान खान फायरिंग प्रकरणात आणखी दोघे पोलिसांच्या ताब्यात; शुटर्सकडे कुठून आलं पिस्तुल?

संजय सिंह यांनी या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) चोवीस तास केजरीवाल यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांकडून त्यांना समजले आहे. केजरीवाल यांची हेरगिरी करत असल्याचं दिसतंय. केजरीवाल यांना २३ दिवसांपासून इन्सुलिन देण्यात आले नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

दिल्लीतील जनतेची सेवा करणे हा केजरीवालांचा गुन्हा आहे का? त्याच्याशी हे वैयक्तिक वैर का? जीव घेऊन विरोधी पक्षनेत्याला संपवायचे आहे का? हे सर्व पीएमओ आणि एलजीच्या देखरेखीखाली होत आहे याचे मला दुःख आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

CM Arvind Kejriwal
Loksabha election 2024 : मोदी अन् योगींना मंगळसूत्राचं काय घेणं-देणं; पंतप्रधानांच्या विधानावर अखिलेश यादवांचं प्रत्युत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com