Delhi Air Pollution : आपण अजून जिवंत कसे? दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली; AIIMSच्या डॉक्टरांचा गंभीर इशारा

Diwali Smog : ‘ग्रीन’ फटाक्यांमुळे उत्सर्जन सुमारे ३०% कमी होते, तरीही मोठ्या प्रमाणात वायू व सूक्ष्म कण बाहेर पडतात; ते पूर्णपणे प्रदूषणमुक्त नाहीत. डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या मते, तीव्र प्रदूषणामुळे बाह्यरुग्ण व आपत्कालीन श्वसन प्रकरणे २०-३०% वाढू शकतात.
Delhi AQI Reaches Very Poor and Severe Levels

Delhi AQI Reaches Very Poor and Severe Levels

esakal

Updated on: 

दिवाळीनंतर राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. शहराच्या हवेत पसरलेल्या विषारी धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वैद्यकीय तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या प्रदूषणाचा परिणाम केवळ दमा किंवा श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर निरोगी व्यक्ती आणि तरुणांनाही त्याचा त्रास जाणवू लागला आहे. एम्समधील एका डॉक्टरांनी तर दिल्लीतील हवेच्या परिस्थितीवर भाष्य करताना, अशा हवेत लोक अजूनही कसे जिवंत आहेत, याचे आश्चर्य वाटत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...