आशा अंगणवाडी सेविकांना दहा हजार प्रियांका गांधी यांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रियांका गांधी

आशा,अंगणवाडी सेविकांना दहा हजार; प्रियांका गांधी यांची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस देखील सर्वशक्तीनिशी उत्तर प्रदेशच्या मैदानात उतरले आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेश सरकारकडून आशा कर्मचाऱ्यांचा अपमान होत असून पुढील वर्षी काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आशा कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यास दरमहा दहा हजार रुपये मानधन देऊ, अशी घोषणा प्रियांका गांधी यांनी केली.

ट्विटरवर प्रियांकांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात शहाजहानपूर येथे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यासाठी भेटण्यासाठी आलेल्या आशा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे दृश्‍य आहे. यावर प्रियांका गांधी यांनी म्हटले की, उत्तर प्रदेश सरकारकडून आशा कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असून हा त्यांच्या कामाचा अपमान आहे.

हेही वाचा: मानवरहित हवाई वाहन कराराचे स्वागत

आशा कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव ओतून काम केलेे. त्यामुळे मानधन त्यांचा हक्क आहे. त्यांचे म्हणणे ऐकणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी पक्ष कटिबद्ध असून पुढील वर्षी काँग्रेसचे सरकार आल्यास आशा कर्मचाऱ्यांना आणि अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये देऊ.

प्रियांकांनी निर्माण केला जनतेत विश्‍वास

संभल: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी प्रियांका गांधी यांच्या धडाडीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, प्रियांका गांधी यांनी विविध प्रश्‍नांवर आवाज बुलंद केल्याने उत्तर प्रदेशच्या जनतेत पक्षाबद्धल नवीन विश्‍वास निर्माण झाला आहे. काल रात्री संभल येथील कलकी महोत्सवात सहभागी झालेले दिग्विजय सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, प्रियांका गांधी यांनी नागरिकांच्या विविध प्रश्‍नांवर पुढाकार घेत भूमिका मांडली आहे. त्यामुळे जनतेत काँग्रेस पक्षाबद्धल विश्‍वास निर्माण झाला आहे. लखीमपूर खेरी प्रकरण असो, हाथरस, आग्रा प्रकरण असो, शेतकरी आंदोलन, व्यापाऱ्याचे प्रकरण असो प्रियांका गांधी यांनी अन्य पक्षाच्या नेत्यांच्या तुलनेत मुद्दे प्रभावीपणे मांडले आहेत. पूर्वी काँग्रेसबाबत फारसे कोणी बोलत नव्हते, परंतु आता चर्चा करत आहेत. हेच मोठे यश असल्याचे दिग्विजयसिंह म्हणाले.

loading image
go to top