मानवरहित हवाई वाहन कराराचे स्वागत | desh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवाई प्रवास

मानवरहित हवाई वाहन कराराचे स्वागत

नवी दिल्ली : भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार गटाची ११वी बैठक आभासी स्वरुपात होऊन तीमध्ये संरक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या गती व प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. ८ नोव्हेंबर रोजी आभासी स्वरूपात पार पाडण्यात आलेल्या संरक्षणविषयक प्रदर्शनाबद्दल तसेच मानवरहित हवाई वाहना(यूएव्ही)संदर्भात करण्यात आलेल्या पहिल्या प्रकल्प कराराचे स्वागत करण्यात आले.

भारत-अमेरिकेदरम्यान संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, तंत्रज्ञान हस्तांतर, सह-निर्मिती व सह-उत्पादन आणि संयुक्तपणे संरक्षण साधनसामग्री व उपकरणे विकसित करणे या उद्देशाने हा संयुक्त गट स्थापन करण्यात आला आहे. वर्षातून या गटाच्या दोन बैठकांचे आयोजन केले जाते व त्यामध्ये सहकार्याचा आढावा घेतला जातो. कोरोनामुळे गेल्यावर्षी व यावर्षी देखील या बैठका दूर-दृक्‌-श्राव्य पद्धतीने घेतल्या गेल्या. भारतातर्फे संरक्षण उत्पादन सचिव राजकुमार व अमेरिकेच्या संरक्षण विभागातील अवर सचिव ग्रेगरी कॉसनेर यांनी या बैठकीत भाग घेतला.

हेही वाचा: Facebookवर मिळतात सरासरी 15 धमक्यांच्या, 5 प्रक्षोभक तर 3 द्वेषपूर्ण पोस्ट्स

लष्कर, हवाईदल व नौदल या सेनेच्या तिन्ही दलांसाठी साधनसामग्री व उपकरणे विकसित करण्याची बाब यामध्ये समाविष्ट आहे. एकूण चार मुद्यांबाबत बैठकीत विचार करण्यात आला.

संरक्षण तंत्रज्ञान सहकार्याबद्दलचा संवाद अधिक ठोस व मजबूत करण्याच्या संदर्भात सुधारित भूमिका व्यक्त करणारे निवेदन जारी करण्याबद्दल या बैठकीत उभय देशांनी एकमत व्यक्त केले. सप्टेंबर-२०२० मध्ये झालेल्या गटाच्या बैठकीनंतर त्यात ठरल्याप्रमाणे मानवरहित हवाई वाहनाच्या संदर्भात करण्यात आलेल्या करारावर सह्या करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

loading image
go to top