Arvind Kejriwal Announcement On Assembly Election : दिल्लीत फेब्रुवारी २०२५ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. युती आणि आघाडीसाठी राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. अशातच आता आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आले आहे.