
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज (ता. ५) कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडत असून सुमारे कोट्यवधी मतदार सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दिल्लीत यावेळी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत होत असली तरी खरा मुकाबला ‘आप’ आणि ‘भाजप’मध्ये होणार आहे.