esakal | दिल्लीत फटाक्यांवर बंदी; दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवालांचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

DELHI CM ARVIND KEJARIWAL

यंदाही दिवाळीला फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे.

दिल्लीत फटाक्यांवर बंदी; दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली मोठ्या प्रमाणावर प्रदुषणाचा सामना करावा लागतो. दिवाळीच्या दिवसात होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे गेल्या वर्षी फटाक्यांची विक्री, साठा आणि वापरावर बंदी घातली होती. यंदाही दिवाळीला फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. त्यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासीन दिवाळीच्या काळात दिल्लीत प्रदुषणाची धोकादायक स्थिती निर्माण होते. त्यापार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री, साठा आणि वापर करण्यावर पूर्ण बंदी घालण्यात येत आहे. यामुळे लोकांचे जीव वाचवता येतील.

हेही वाचा: स्पुटनिक लाइटला तिसऱ्या टप्प्यात चाचणीसाठी DCGI ची मंजुरी

केजरीवाल यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केलं की, गेल्या वर्षी व्यापाऱ्यांकडून फटाक्यांच्या साठ्यानंतर प्रदुषणाचे गांभीर्य पाहून बंदी घातली. त्यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान झालं होतं. आता सर्व व्यापाऱ्यांना आवाहन आहे की राज्यात पूर्ण बंदी असल्यानं कोणत्याही प्रकारे साठा करू नये.

loading image
go to top