esakal | स्पुटनिक लाइटला तिसऱ्या टप्प्यात चाचणीसाठी DCGI ची मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

sputnik-covishield

डीसीजीआयने स्पुटनिक लाइटच्या ट्रायलसाठी शिफारस केली होती. स्पुटनिक लाइट या लशीचा सिंगल डोस दिला जातो.

स्पुटनिक लाइटला तिसऱ्या टप्प्यात चाचणीसाठी DCGI ची मंजुरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारतात कोरोनाविरोधात लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून यात आणखी एक चांगली बातमी समोर येत आहे. रशियन व्हॅक्सिन स्पुटनिक लाइटला भारतात तिसऱ्या टप्प्यात ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. डीसीजीआयने भारतीयांवर चाचणीसाठी स्पुटनिक लाइटला परवानगी दिली आहे. डीसीजीआयने स्पुटनिक लाइटच्या ट्रायलसाठी शिफारस केली होती. स्पुटनिक लाइट या लशीचा सिंगल डोस दिला जातो.

डीसीजीआयने भारतीयांवर स्पुटनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. याआधी जुलै महिन्यात डीसीजीआयच्या समितीने स्पुटनिक लाइटच्या आपत्कालीन वापरासाठी नकार दिला होता. या लशीची भारतीयांवर चाचणी व्हायला हवी असं कारण समितीने दिलं होतं.

हेही वाचा: "ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकार घटनादुरुस्ती का करत नाही?"

स्पुटनिक लाइट स्पुटनिक व्हीच्या कंपोनंट १ डेटासारखीच होती. तसंच भारतीय लोकांमध्ये ही सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही याची चाचणी पहिल्या टप्प्यात घेण्यात आली होती. लँसेटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कोरोनाविरोधात स्पुटनिक लाइट ही ७८.६ ते ८३.७ टक्के प्रभावी दिसून आली आहे. दोन डोसची ही लस इतर लशींच्या तुलनेत जास्त प्रभावी आहे. अर्जेंटिनामध्ये याचा अभ्यास कमीत कमी ४० हजार वृद्धांवर करण्यात आला होता.

loading image
go to top