Fraud : इन्स्टाग्रामवर नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलेची फसवणूक; गमावले 8.6 लाख रुपये

Instagram
Instagram Sakal

नवी दिल्ली : जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात असता, तेव्हा खोट्या जॉब पोस्टला बळी पडण्याची शक्यता अधिक वाढते. कंपन्यांमध्ये सातत्याने सुरू असलेल्या कपातीमुळे हजारो लोक नोकरीच्या शोधात आहेत. मात्र नवी नोकरी शोधताना सावधगिरीने नोकरी शोधायला हवी.

Instagram
PM Modi: काळी टोपी, खाकी पँट अन् प्रिंटेड टी-शर्ट; व्याघ्र प्रकल्पात जाण्यापूर्वी स्टाईलमध्ये दिसले मोदी

नोकरी शोधत असताना संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. याच कारण म्हणजे, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अर्ज करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीतील एका महिलेला तब्बल ८.६ लाख रुपये गंडा घालण्यात आला.

दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने इन्स्टाग्रामवर नोकरीची जाहिरात क्लिक करताच, तिची तब्बल ८.६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये तिच्या पतीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि सांगितले की त्याच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर नोकरीची जाहिरात पाहिली आणि दिलेली लिंक उघडली.

Instagram
रामलल्लाचं दर्शन घेऊन फडणवीस दिल्लीला जाणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Devendra Fadnavis Ram Mandir Visit

त्यानंतर तिला 'airlinejoballindia' नावाच्या दुसऱ्या संकेतस्थळावर पाठवण्यात आले. तिथे तिची माहिती विचारण्यात आली. महिलेने माहिती टाकल्यानंतर तिला राहुल नावाच्या व्यक्तीचा फोन आला. फसवणूक करणाऱ्याने पीडितेला आधी 'नोंदणी शुल्क' म्हणून ७५० रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला 'गेट पास फी, इन्शुरन्स, सिक्युरिटी मनी'ची मागणी केली. त्यावर महिलेने त्याच्या खात्यात ८.६ लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केली. मात्र समोरचा व्यक्ती आणखी पैशांची मागणी करतोय हे पाहिल्यावर महिलेला शंका आली. त्यानंतर महिलेने ही घटना पोलिसांना सांगितली.

दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. डीसीपी संजय सैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान असे आढळून आले की, सर्वाधिक पैसे हरियाणातील हिसार मधून काढण्यात आले होते. आरोपीच्या मोबाइलचे लोकेशनही याच ठिकाणी होते. त्यानंतर पथकातील सदस्यांनी छापा टाकून आरोपींना अटक केली. कोविड-19 महामारीच्या काळात नोकरी गेल्यानंतर लोकांची फसवणूक सुरू केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com