भाजपने दिल्लीत घेतला मोठा निर्णय, आता टिचरचे 'आदेश'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज तिवारी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. 

नवी दिल्ली, 02 जून  : दिल्ली भाजपने मोठा निर्णय़ घेत खासदार आणि अभिनेता मनोज तिवारी यांची पक्षाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मनोज तिवारी यांना हटवून आदेश गुप्ता यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. यासोबतच छत्तीसगढच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती केली. मनोज तिवारी यांना का हटवण्यात आलं याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
मनोज तिवारी यांना हटवून दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी आदेश गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. एक वर्ष आधी आदेश गुप्ता हे नॉर्थ एमसीडीचे महापौर होते. गेल्या काही काळापासून पक्षाकाच्या कार्यकर्त्यांकडून याबाबत मागणी होत होती. आदेश गुप्ता हे एकेकाळी ट्यूशन घेऊन घर चालवत होते. 
देशातील इतर बातम्या - दिलासादायक! कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असलीतरी...
लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज तिवारी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोमवारी अटकही करण्यात आली होती. दिल्लीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात केजरीवाल यांचे सरकार अपयशी ठरलं असून त्याविरोधात राजघाट इथं आंदोलन करण्यात आलं होतं.
भारत नक्कीच आत्मनिर्भर बनेल; हा आहे नवा फॉर्म्युला :  पंतप्रधान मोदी 
याआधीही मनोज तिवारी यांच्यावर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ते क्रिकेट सामना खेळण्यासाठी हरियाणाला गेले होते. तसंच सामन्यावेळी मास्कही वापरला नाही. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केलं होतं. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दिल्लीच्या निवडणुकीत पराभवामुळे मनोज तिवारी यांची गच्छंती झाल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2020 मध्ये झाल्या होत्या. यामध्ये भाजपला एकूण फक्त 8 जागा मिळाल्या होत्या. भाजपने दिल्लीत मनोज तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi bjp removed manoj tiwari from delhi bjp president adesh gupta appointed