भारत नक्कीच आत्मनिर्भर बनेल; 'हा' आहे नवा फॉर्म्युला : पंतप्रधान मोदी 

Coronavirus may have slowed economy, but India will get its growth back
Coronavirus may have slowed economy, but India will get its growth back

नवी दिल्ली : भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, संकट व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत नक्कीच आत्मनिर्भर बनेल असा मला विश्वास वाटतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनि केले आहे. सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनामुळे आपला वेग कितीही धीमा झाला असला तरी, भारताने लॉकडाउनला मागे सोडून अनलॉक फेज-१ मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरु झाला आहे. ८ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. जगात करोना व्हायरस पसरत असताना भारताने योग्य पावले उचलली त्यामुळे भारतात कोरोनाव्हायरस आटोक्यात असल्याचेही मोदींनी सांगितले.

Intent, Inclusion, Investment, Infrastructure and Innovation— these five things are important to speed up India's development and make it 'atmanirbhar'. You will get a glimpse of these in the bold decisions recently taken by us: PM Narendra Modi pic.twitter.com/vcZpx5BcEl

— ANI (@ANI) June 2, 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, कोरोना व्हायरस या संघर्षाच्या स्थितीत ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाला आहे. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. पण त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचं आहे. अर्थव्यवस्थेला मजबूत करणे सरकारचं प्राधान्य आहे. यासाठी केंद्र सरकार विविध निर्णय घेत आहे. यामध्ये तातडीच्या निर्णयासोबतच दीर्घकालीन फायदा देणाऱ्या निर्णयांचाही समावेश आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत ७४ कोटी लोकांना रेशन दिलं असून स्थलांतरित मजुरांना मोफत अन्नधान्य दिलं. आतापर्यंत गरीब कुटुंबाच्या खात्यावर ५३ हजार कोटी रुपये टाकले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

लॉकडाऊन काळात ८ कोटी गॅस सिलेंडर मोफत दिले. खासगी कर्मचाऱ्यांना २४ टक्के ईपीएफओने सरकारने दिला. तसेच शेतकऱ्यांबद्दल अनेक निर्णय घेतले. यात शेतकरी आता कुठेही आपला माल विकू शकतो. कोल सेक्टरमध्येही अनेक निर्बंध उठवले आहेत. मायनिंग नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com