

delhi blast
esakal
Red Fort Blast Updates: दिल्ली स्फोटाचा तपास वेगाने सुरु आहे. ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी अशी प्रकरणं हाताळली आहेत, अशा अधिकाऱ्यांना एनआयएने पाचारण केलं आहे. बुधावारी काश्मीरची लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या, माजी आयपीएस अधिकारी शाहिदा परवीन गांगुली दिल्लीत घटनास्थळी पोहोचल्या. शाहिदा ह्या जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या सदस्य राहिलेल्या आहेत.