दिल्ली हिंसाचार : भाजप नेत्यावर गुन्हा; गंभीरही म्हणाला कारवाई व्हावी

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

दिल्ली पोलिसांनी या हिंसाचारप्रकरणी कपिल मिश्रा यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत. तर आपच्या नगरसेवक रेश्मा नदीम आणि हसीब उल हसन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) दिल्लीत रविवारी रात्री आणि आज (सोमवार) सकाळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी भाजप नेते कपिल मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाजप खासदार गौतम गंभीरनेही कारवाईची मागणी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी या हिंसाचारप्रकरणी कपिल मिश्रा यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत. तर आपच्या नगरसेवक रेश्मा नदीम आणि हसीब उल हसन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल मिश्रा यांनी केलेल्या भडकाऊ भाषणानंतर हिंसाचार उफाळल्याचे सांगण्यात येत आहे. 

दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी खासदार गौतम गंभीरनेही दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गंभीर म्हणाला, की दिल्लीतील परिस्थिती खूप खराब आहे. भडकाऊ भाषण देणारा कोणीही असो मग तो भाजप नेता कपिला मिश्रा असेल किंवा अन्य कोणी त्यांच्याविरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi caa clashes complaint against bjp leader kapil mishra over maujpur bhajanpura violence