Arvind Kejriwal : जर मी चोर, तर मग जगात कोणीच इमानदार नाही; केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

Arvind Kejriwal Narendra Modi
Arvind Kejriwal Narendra Modi sakal

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्यधोरण प्रकरणी सीबीआयने समन्स बजावल्यानंतर मोदी सरकारवर हल्ला बोल केला आहे. तसेच आपण चोर असेल तर जगात कोणीही इमानदार नसल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं.

Arvind Kejriwal Narendra Modi
Artificial Intelligence : बापरे! अपहरणासाठी झाला AI चा दुरुपयोग; आवाजाचे क्लोनींग करून...

माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, मनीष सिसोदिया यांच्यावर 14 फोन फोडल्याचा आरोप आहे. मग ईडी सांगते त्यापैकी 4 फोन आमच्याकडे आहेत. तर सीबीआय म्हणतं 1 फोन आमच्याकडे आहे. मग जर सिसोदियांनी फोन तोडले असेल तर त्यांना कॉल कसे आले, असा सवाल करत या लोकांनी खोटे बोलून दारुचा घोटाळा झाल्याचा आव आणल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, सीबीआय, ईडीने मद्यधोरण प्रकरणात न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले, ते मनीष सिसोदिया आणि माझ्याविरोधात साक्ष देण्यासाठी लोकांवर अत्याचार करत आहेत. ईडी, सीबीआयने १०० कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी ४०० हून अधिक छापे टाकले, पण ही रक्कम सापडली नाही. केजरीवाल पुढे म्हणाले की, दिल्ली उत्पादन शुल्क धोरण उत्कृष्ट होते. त्यामुळे भ्रष्टाचार संपला असता.

What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Arvind Kejriwal Narendra Modi
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या दौऱ्यावरुन भाजपमध्ये दोन मतप्रवाह; मुनगंटीवारांची वेगळी भूमिका

ज्या दिवशी मी दिल्ली विधानसभेत भ्रष्टाचाराविरोधात बोललो, त्या दिवशी मला माहित होते की पुढचा क्रमांक माझा असेल. गेल्या ७५ वर्षांत 'आप'सारखे कोणत्याही पक्षाला टार्गेट करण्यात आलेले नाही; आम्ही लोकांमध्ये चांगल्या शिक्षणाची आस निर्माण केली. मात्र त्यांना ही आस संपवायची असा आरोप केजरीवाल यांनी केला.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवताना म्हटले की, एवढ्या कारवाईनंतरही एक पैसाही मिळाला नाही. केजरीवाल म्हणाले, 17 सप्टेंबर ला संध्याकाळी 7 वाजता मी नरेंद्र मोदींना एक हजार कोटी रुपये दिले होते. करा मग त्यांना अटक. कोणीही देशात उभे राहून काहीही बोलतील. या आधारावर तुम्ही नरेंद्र मोदींना अटक करणार का? त्यासाठी काही पुरावे लागतील. असंही केजरीवाल यानी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com