Arvind Kejriwal : केजरीवालांकडून नव्या राष्ट्रीय मिशनची घोषणा; सांगितला प्लान

Kejriwal
Kejriwal Sakal

Arvind Kejriwal Make India Number One Campaign : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी 'मेक इंडिया नंबर वन' या नव्या मिशनची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला भारताला जगात नंबर वन बनवायचे आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी हे अभियान सुरू केले जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी देशातील 130 कोटी जनतेला चांगले आणि मोफत शिक्षण, मोफत उपचार, प्रत्येक तरुणाला नोकरी, महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्यांची समृद्धी यासाठी प्रयत्न करावे लागतील.

अरविंद केजरीवाल म्हणाले, ही स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे. भारताने जगातील नंबर वन देश व्हावे अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशात भारताची गणना व्हायला हवी. भारत एक शक्तिशाली राष्ट्र बनला पाहिजे असे म्हणत भारत एक महान देश असून, आपली सभ्यता हजारो वर्षे जुनी असल्याचे केजरीवाल म्हणाले. एक काळ असा होता की, जगभर भारताचा डंका वाजत होता. हे लक्ष्य समोर ठेवून आपल्याला भारताला पुन्हा महान बनवायचे असून, भारताला नंबर वन बनवण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 130 कोटी जनतेला याला जोडावे लागले.

'आम्ही मागे का पडलो, लोकांमध्ये नाराजी'

अरविंद केजरीवाल म्हणाले की, स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, या काळात आपण खूप काही मिळवले, पण लोकांमध्ये संताप आहे, प्रश्न असा आहे की, या 75 वर्षांत असे अनेक देश आहेत जे आपल्यानंतर स्वतंत्र झाले आणि आपल्या पुढे गेले. सिंगापूरला आपल्यानंतर 15 वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले, आज त्यांनी भारताला मागे टाकत आघाडी घेतली आहे. भारतातील लोक जगातील सर्वात बुद्धिमान आणि मेहनती लोक आहेत, जगातील सर्वोत्तम आहेत तरीही आपण मागे राहिलो. जर देश काँग्रेस-भाजपच्या भरवशावर सोडला तर, पुढची 75 वर्षे आपण मागे पडू असा हल्लाबोलही केजवाल यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com