
दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे. २० फेब्रुवारीला राजधानीतील रामलीला मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. त्याआधी, बुधवारी (१९ फेब्रुवारी) भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे. याआधी १८ तारीख निश्चित केली होती. मात्र ती आता बदलण्यात आली आहे.