दिल्लीतील महिलांना केजरीवालांची ओवाळणी; मोफत प्रवास योजना सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

दिल्लीत आता मोफत प्रवास योजनेअंतर्गत "डीटीसी' आणि "क्‍लस्टर' बसमधून महिला मोफत प्रवास करू शकणार आहेत.

 

नवी दिल्ली : दिल्लीतील महिलांसाठी मोफत बसप्रवास सुरू करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी भाऊबिजेची ओवळणी घातली. मोफत प्रवास योजनेअंतर्गत "डीटीसी' आणि "क्‍लस्टर' बसमधून महिला मोफत प्रवास करू शकणार आहेत. राज्य सरकारने सोमवारी (28 ऑक्टोबर) रात्रीच याबाबत अधिसूचना जारी केली.

चला गोव्याला अल्हाददायक वातावरण अनुभवायला

महिला मिळणार गुलाबी तिकिट
या योजनेसाठी दिल्ली वाहतूक महामंडळातर्फे (डीटीसी) महिलांना गुलाबी तिकीट देणार असून, प्रवासासाठी भाडे घेतले जाणार नाही. याबाबत केजरीवाल यांनी ट्‌विट केले आहे. "माझ्या दिल्लीतील कुटंबांमधील सर्व भगिनींना गुलाबी तिकिटाद्वारे मी भाऊबिजेच्या शुभेच्छा पाठवीत आहे. तुम्ही सुरक्षित आणि प्रगती करीत राहा. महिलांची जेव्हा प्रगती होईल, तेव्हा देशाचीही प्रगती होईल.' असे त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटबरोबर केजरीवाल यांनी दिल्ली वाहतूक मंत्र्यांनी पोस्ट केलेल्या छायाचित्राही उल्लेख केला आहे. बसमध्ये बसलेल्या महिलेच्या हातात गुलाबी तिकीट असल्याचे दर्शविले आहे.

जेएनयूत राडा; विद्यार्थ्यांनी अडवली रुग्णवाहिका

बसमध्ये सुरक्षारक्षकांची फौज
सार्वजनिक बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या संरक्षणासाठी तैनात सुरक्षारक्षकांची संख्या 13 हजारपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी बसमधील सुरक्षारक्षकांची जी फौज उभी केली आहे, ती जगातील अन्य कोणत्याही असेल असे वाटत नाही,'' असे केजरीवाल यांनी आज सांगितले. याआधी बसमध्ये तीन हजार 400 सुरक्षारक्षक नेमलेले होते. ""या योजनेमुळे महिला सुरक्षित प्रवास करू शकतील आणि देशाच्या राष्ट्रीय राजधानीच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा सहभाग वाढवू शकतील,'' असे ट्‌विट उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले आहे. मोफत बसप्रवासाची सुविधा नोएडा, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर), विमानतळ तसेच "डीटीसी' व "क्‍लस्टर' बसतर्फे दिल्या जाणाऱ्या विशेष सेवांसाठी लागू होणार आहे. या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातील भाषणात केजरीवाल यांनी दिल्लीतील महिलांसाठी मोफत बससेवा योजनेची घोषणा केली होती. दिल्ली मंत्रिमंडळाने 29 ऑगस्ट रोजी या योजनेला मंजुरी दिली होती.

महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत नाही : संजय राऊत

योजनेची वैशिष्ट्ये 

  1. गुलाबी रंगाचे तिकीट कंडक्‍टरकडून विनाशुल्क मिळणार 
  2. डीसीटी (साधी व वातानुकूलित), क्‍लस्टर बसमधून मोफत प्रवास शक्‍य 
  3. दिल्ली व "एनसीआर' परिसरात योजना लागू 
  4. प्रत्येक गुलाबी तिकिटामागे सरकार "डीटीसी'ला दहा रुपये देणार. यामुळे या बससेवेला तोटा होणार नाही 
  5. बसमध्ये सुरक्षारक्षक तैनात 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi cm arvind kejriwal announces free metro and bus ride to women diwali gift