जैन यांच्यानंतर आता सिसोदियांचा नंबर; केजरीवालांनी केला मोठा दावा

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नुकतीच दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी एटक केली आहे.
Arvind Kejriwal Manish Sisodia
Arvind Kejriwal Manish Sisodiaesakal

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नुकतीच दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी एटक केली आहे. दरम्यान, जैन यांच्यानंतर आता केंद्र सरकार दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या तयारीत आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे. (Arvind Kejriwal On Manish Sisodia)

केजरीवाल म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी सत्येंद्र जैन यांना खोट्या प्रकरणात केंद्र सरकार अडकवणार असल्याचे विधान केले होते. आज जैन यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल पुढे म्हणाले की, मनीष सिसोदिया हे देशातील शैक्षणिक क्रांतीचे जनक आणि कदाचित स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम शिक्षण मंत्री आहेत. पूर्वी गोरगरिबांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये तिसरीचे शिक्षण मिळायचे. दिल्लीतील शाळांमध्ये १८ लाख मुले शिकतात. या सर्वांचे भविष्य अंधारात होते, मनीष यांनी त्यांच्या डोळ्यात भविष्याची सोनेरी स्वप्ने दिली असल्याचे ते म्हणाले.

मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांची 9 जूनपर्यंत ED कोठडीत रवानगी

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyender Jain) यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering) अंमलबजावणी संचालनालयाने नुकतीच अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 जूनपर्यंत ईडी कस्टडीत (ED Custody) पाठवण्यात आले आहे. जैन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचे (Money Laundering Case) हे ईडी प्रकरण ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांच्या आणि इतरांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याबद्दल नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित आहे.

ईडीने या वर्षी एप्रिलमध्ये सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात जप्त केली होती. जैन हे दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), उद्योग, शहरी विकास, पूर, सिंचन आणि जलमंत्री आहेत. 2018 मध्ये, ईडीने या प्रकरणासंदर्भात शकूर बस्ती येथील आपच्या आमदाराची चौकशी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com