
Arvind Kejriwal : शेकोटीवर हात शेकले तरी प्रदूषण वाढतंय; केजरीवालांचा दावा
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाबद्दल आज एक विधान केलं आहे. वाढत असलेल्या प्रदूषणामध्ये कशाचा किती वाटा, यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
दिल्लीमध्ये प्रदूषणाची रिअल टाईम मॉनिटरिंग होणार आहे. तशी व्यवस्था राजधानीत करण्यात आलेली आहे. ही माहिती देतांना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळेला शहरात सिक्युरिटी गार्ड आणि वाहन चालक शेकोटी पेटवून हात शेकतात. त्यामुळे हवा खराब होत आहे.
हे ही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
दिल्लीत होत असलेल्या प्रदूषणाचा चौथा ते पाचवा वाटा हा शेकोटींचा असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते म्हणाले की, कोणत्या भागात वाहनांमुळे प्रदूषण होतं, कोणत्या भागात उद्योगांमुळे प्रदूषण होतं आणि कुठे बायोमास बर्निंगमळे प्रदूषण होतं, याचा डेटा समोर येत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यात मदत होणार असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केलं.
केजरीवाल यांनी सांगितलं की, एक तृतीयांश प्रदूषण हे दिल्लीबाहेरचं असून मागील तीन महिन्यांपासून ते स्थिर आहे. दुसऱ्या क्रमांकावर बायोमास बर्निंग आहे. सिक्युरिटी गार्ड आणि इतर रात्रपाळीचे लोक हात शेकण्यासाठी शेकोटी पेटवतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शेकोटी पेटवण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. दिल्लीतील एकूण प्रदूषणापैकी २५ टक्के प्रदूषण शेकोट्यांमुळे होत असल्याचं त्यांनी सांगितलं.