"तुकाराम महाराजांनी धिरेन्द्र स्वामींचं थोबाड फोडलं असतं", अंनिसचे संस्थापक भडकले
बागेश्वर महाराज चमत्काराच्या मुद्द्यावरुन चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणी त्यांना नागपूर पोलिसांनी क्लिनचिट देखील दिली आहे. दरम्यान बागेश्वर महाराज यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. बागेश्वर महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. आधी चमत्काराचा दावा आता आक्षेपार्ह विधान त्यामुळे बागेश्वर महाराजांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या वादग्रस्त वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर संत तुकाराम यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर संत तुकाराम महाराजांनी धीरेंद्र महाराज याच थोबाड फोडलं असतं, असं शाम मानव यांनी म्हंटलं आहे. आता तरी धीरेंद्र महाराज याच्यावर गुन्हा दाखल करा असं शाम मानव यांनी म्हंटलं आहे.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, हा फक्त संत तुकाराम महाराज यांचा नाही तर संपूर्ण संत परंपरेचा अपमान आहे. धीरेंद्र महाराज यांचं विधान आक्षेपार्ह आहे. तुकाराम महाराजांच योगदान फार मोठं आहे. तर संत तुकाराम यांनी बुवाबाजीसह अंधश्रद्धेवर ज्या पद्धतीने कडाडून प्रहार केला आहे. सर्व बाबांची भोंदुगिरी उघडकीस आणली आहे असंही शाम मानव यांनी म्हंटलं आहे.
हे ही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
काय आहे वादग्रस्त वक्तव्य?
"महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या पत्नी रोज मारत असत. त्यांना रोज काठीने मारत होते. यावेळी त्यांना कोणीतरी विचारले तुम्हाला पत्नी मारते, तुम्हाला काहीच वाटत नाही का. तर तुकाराम महाराज म्हणाले, देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. पत्नीच्या चक्करमध्ये पडलो असतो. पण मारणारी पत्नी मिळाली तर मला संधी मिळाली देवावर प्रेम करण्याची," असे वादग्रस्त विधान बागेश्वर महाराजांनी केले. त्यामुळे त्यांचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.
बागेश्वर महाराजांविषयी थोडक्यात
बागेश्वर महाराज मध्यप्रदेशातल्या छतपूर जिल्ह्यात राहतात. बागेश्वर दरबारात लाखोंनी भाविक आपल्या समस्या घेऊन जातात. धीरेंद्र शास्त्री हे जगभरात बागेश्वर धाम सरकार (महाराज) नावाने प्रसिध्द आहेत. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतात. युट्युब वर देखील लाखोंनी लोक त्यांना ऐकतात. बऱ्याच ठिकाणांहून कथा करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. नागपूरमध्ये त्यांची कथा १३ जानेवारीपर्यंत होणार होती. पण ते ११ जानेवारीलाच तिथून निघून गेले. त्यानंतर वाद पेटला.
त्यांच्या विषयी सांगितलं जातं की, ते लोकांच्या मनातलं ओळखू शकतात. एवढंच नाही तर ते त्यांच्या दरबारात येणाऱ्या लोकांच्या फोनचा नंबर, घरात ठेवलेल्या वस्तूंविषयीपण सांगतात. त्यांच्या या गोष्टी सगळ्यांसमोर सिध्द करण्याचं आव्हान अंनिस ने त्यांना दिलं होतं. याविषयी देशभरात वाद उठला होता.