
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) विशेष ‘व्हीआयपी’ सुरक्षा समूहाकडे गुप्ता यांच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. दरम्यान, राजेश खिमजी नावाच्या हल्लेखोराची न्यायालयाने पाच दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली आहे.