भारत बचाओ, भारत बचाओ! रॅली काढत काँग्रेस उतरलं दिल्लीच्या मैदानात

वृत्तसंस्था
Saturday, 14 December 2019

दिल्लीत रामलीला मैदानावर 'भारत बचाओ रॅली' घेण्यात येणार आहे. या रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शनाचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली : आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर आक्रमक होत काँग्रेसकडून आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात 'भारत बचाओ' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिल्लीत रामलीला मैदानावर 'भारत बचाओ रॅली' घेण्यात येणार आहे. या रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शनाचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसच्या बैठकीत सरकारला घेरण्याबरोबरच सभेतून शक्तिप्रदर्शनाचीही रणनीती आखण्यात आली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते त्याचप्रमाणे संलग्न संघटनांचे प्रमुख या वेळी हजर आहेत. बैठकीनंतर संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला 'भारत बचाओ रॅली'च्या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना देतील.

आर्थिक समस्या, बेरोजगारी, शेती हे प्रमुख मुद्दे देशासमोर असून, भाजप सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. सरकारच्या धोरणांवर या रॅलीतून जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून वाद सुरु असताना ही रॅली होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Congress is organising Bharat Bachao rally at Ramlila Maidan