धक्कादायक! भारतात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू: Corona Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid

Corona Update: धक्कादायक! भारतात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानाने हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. चीनमधील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेत अनेक देशांनी सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. अशातच भारतातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. (Delhi Corona Update CM Arvind Kejriwal calls emergency meeting Covid 19 situation)

भारत सरकारकडून कोरोनासंदर्भात सावध भूमिका घेत उच्चस्तरीय बैठका घेतल्या जात आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत.

सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

दिल्लीत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. एकूण 27 रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत दिल्लीतील कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.

कोरोनाचं पुन्हा निर्माण झालेलं संकट पाहता चौथा डोसही घ्यावा लागू शकतो अशी शक्यता एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलीय. पण या संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही. हेट्रोव्हॅक्सिनमुळे सकारात्मक परिणाम दिसल्याचं ते म्हणाले. लसीकरणामुळे व्हायरसच्या विरोधात शरीर आणखी मजबुतीने लढा देतं. त्यामुळे कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी लसीकरण गरजेचं आहे असं रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Coronaviruscovid19