
दिल्लीतील तीस हजारी न्यायालयालाने बारमध्ये अश्लील नृत्य सादर केल्याच्या आरोपाखाली सात महिलांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात कोणताही गुन्हा घडला आहे हे सिद्ध करण्यात वकिलांना अपयश आले, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने च्या तक्रारीवरुन या महिलांविरोधा आयपीसीच्या कलम २९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.