Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच; न्यायालयाने सुनावली १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

Arvind Kejriwal: मद्य विक्री धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची २८ मार्चला चार दिवसांची ईडी कोठडी वाढवली होती.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalEsakal

दिल्ली मद्य विक्री धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपली. त्यामुळे केजरीवाल यांना पुन्हा राऊज एव्हीन्यू कोर्टाच्या पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. आजच्या सुनावणीवेळी अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश (पीसी ॲक्ट) कावेरी बावेजा यांनी हे निर्देश दिले आहेत.

मद्य विक्री धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची २८ मार्चला चार दिवसांची ईडी कोठडी वाढवली होती. केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली होती. त्यानंतर केजरीवाल यांना ईडीने २२ मार्चला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने केजरीवाल यांना सहा दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवलं होतं. आजच्या सुनावणीवेळी अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Arvind Kejriwal
Loksabha Election 2024 : भाजपने दोनशे जागा जिंकून दाखवाव्यात ; ममता बॅनर्जी यांचे आव्हान

अरविंद केजरीवाल यांच्यावरील सुनावणीवेळी आज न्यायालयाने 'ईडी'ला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रावर भाष्य केलेले नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. यावेळी ईडीने केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी केली. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Arvind Kejriwal
Income Tax on Congress: "काँग्रेसला 1700 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जबरदस्ती करणार नाही"; इन्कम टॅक्स विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण

केजरीवाल यांना अटक का झाली?

दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मधील कथित घोटाळ्यात ईडी मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. याला दारू घोटाळा असेही म्हणतात.

जुलै 2022 मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी एलजी व्हीके सक्सेना यांना अहवाल सादर केला होता. यामध्ये अबकारी धोरणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी आधी सीबीआयने आणि नंतर ईडीने गुन्हा दाखल केला.

दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी २६ फेब्रुवारीला या कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना देखील अटक करण्यात आली होती.

Arvind Kejriwal
Uber Ride: 62 रुपयांची UBER राईड बुक केली अन् उतरल्यानंतर बील झालं 7 कोटी, काय घडलं होतं नेमकं?

तर गेल्या वर्षी २ नोव्हेंबरला ईडीने केजरीवालांना पहिला समन्स पाठवला होता.तेव्हापासून आत्तापर्यंत ईडीने केजरीवांलाना १० समन्स पाठवले आहेत. इतके समन्स पाठवूनही ते ईडासमोर हजर झाले नव्हते.

दरम्यान, काल(गुरूवारी) दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देणारी याचिका फेटाळली. काल(गुरूवारी) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईडीचे आधिकारी केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी केजरीवालांची चौकशी केली त्यानंतर त्यांनी अटक करण्यात आली.

Arvind Kejriwal
Katchatheevu Island Row: भाजपनं उकरुन काढलेल्या कच्चाथिऊ प्रकरणावर डीएमकेचं प्रत्युत्तर; इलेक्टोरल बॉण्ड...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com