Katchatheevu Island Row: भाजपनं उकरुन काढलेल्या कच्चाथिऊ प्रकरणावर डीएमकेचं प्रत्युत्तर; इलेक्टोरल बॉण्ड...

तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी आणि पंतप्रधान इंदिरा गांधींना भाजपनं टार्गेट केलं आहे.
Katchatheevu Island Row
Katchatheevu Island Row

नवी दिल्ली : भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रीलंकेच्या कच्चाथिऊ बेटाचा मुद्दा पुन्हा एकदा उकरुन काढला आहे. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी आणि पंतप्रधान इंदिरा गांधींना भाजपनं टार्गेट केलं आहे. याला आता डीएमकेच्यावतीनं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. (DMK spokesperson Saravanan Annadurai reacts to EAM Dr S Jaishankar alleging over Katchatheevu Island Row)

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत कच्चाथिऊ बेटाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस आणि डीएमकेवर निशाना साधला होता. याला डीएमकेचे प्रवक्ते सर्वानन अन्नादुराई यांनी म्हटलं की, "तुम्ही गेल्या १० वर्षांपासून सत्तेत आहात, या काळात तुम्ही काय केलं? गेल्या दहा वर्षात भाजपनं कच्चाथिऊ श्रीलंकेकडून परत घेण्यासाठी काहीही केलं नाही. पण आत्ताच भाजपला काय झालंय? कारण त्यांना हे चांगलं माहिती आहे की, त्यांना देशभरात १५० जागाही मिळणं मुश्कील आहे. पण त्यांना आता कच्चाथिऊचा मुद्दा यासाठी घ्यायचा आहे की, त्यांना इलेक्टोरल बॉण्डवरुन दुसरीकडं लक्ष वळवायचं आहे" (Latest Marathi News)

Katchatheevu Island Row
Katchatheevu Island Row: CAA विरुद्ध कच्चाथिऊ बेट? भाजपनं का उपस्थित केला हा नवा मुद्दा

काय आहे वाद?

नुकतीच एका आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूचं कच्चिथाऊ बेट श्रीलंकेला सोपवण्यात आलं आहे. सन १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारनं हा निर्णय घेतला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांच्या आरटीआयमधून हा खुलासा झाला आहे. हे कच्चाथाऊ बेट हिंदी महासागराच्या दक्षिण दिशेला स्थित आहे.

२८५ एकरात पसरलेलं हे बेट भारत-रामेश्वरम आणि श्रीलंका या यांच्यामध्ये आहे. १७ व्या शतकात हे बेट मदुराईचे राजा रामानंद यांच्याकडं होतं. त्यानंतर इंग्रजांच्या काळात त्याचा समावेश मद्रास प्रेसिडन्सीमध्ये झाला. हे बेट मच्छिमारीसाठी चांगलं बेट मानलं जातं, त्यामुळं भारत आणि श्रीलंका या दोघांकडून या बेटावर हक्का सांगितला जातो. (Marathi Tajya Batmya)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com