

Capital Crime Former Servant Suspected in Woman Murder Case
Esakal
दिल्लीत आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. हत्या करण्याआधी तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दक्षिण पूर्व दिल्लीत अमर कॉलनीत ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी घरातल्या नोकरावर संशय व्यक्त केला आहे. त्याला नुकतंच कामावरून काढून टाकलं होतं.