दिल्लीला विकास हवा; जाहिराती नकोत - जे. पी. नड्डा

पीटीआय
शनिवार, 11 जानेवारी 2020

दिल्लीतील जनतेला विकास हवा आहे, विकासाचे दावे करणाऱ्या जाहिराती नको, अशी टीका भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नड्डा यांनी आज भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

नवी दिल्ली - दिल्लीतील जनतेला विकास हवा आहे, विकासाचे दावे करणाऱ्या जाहिराती नको, अशी टीका भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नड्डा यांनी आज भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आम आदमी पक्षाच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली असून, त्यांचा खरा चेहरा उघड करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घरोघर जाऊन सत्य परिस्थिती सांगावी, असे आवाहन नड्डा यांनी या वेळी केले. ‘‘केजरीवाल सरकारने जनतेवर केलेला अन्याय आम्ही उघड पाडू. दिल्लीला विकासाची गरज आहे, जाहिरातींची नाही,’’ असे नड्डा म्हणाले. नड्डा हे दिल्लीच्या विविध भागांत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत. 

आणखी वाचा - स्मृती इराणींचे दीपिका पदुकोनला थेट आव्हान

दुसरीकडे, ‘आप’नेही भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. केंद्रातील भाजपने दिल्लीचा विकास रोखला असून, शहराची कचराकुंडी केली आहे, अशी टीका आप नेत्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi does not want ads for development jp nadda