JNU Attack : स्मृती इराणींचे दीपिकाला थेट आव्हान; म्हणाल्या...

वृत्तसेवा
Friday, 10 January 2020

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अभिनेत्री दीपिकाला थेट आव्हान दिले आहे. त्यांनी दीपिकावर हल्लाबोल करताना दीपिकाने पहिल्यांदा आपली राजकीय विचारसरणी जाहीर करावी आणि जेएनयूमध्ये जाण्याचं कारण स्पष्ट करावं असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अभिनेत्री दीपिकाला थेट आव्हान दिले आहे. त्यांनी दीपिकावर हल्लाबोल करताना दीपिकाने पहिल्यांदा आपली राजकीय विचारसरणी जाहीर करावी आणि जेएनयूमध्ये जाण्याचं कारण स्पष्ट करावं असं म्हटलं आहे. कोणी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न असल्याचेही स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. मात्र, दीपिका तिथे का गेली याचं उत्तर तिने द्यायला हवे, असेही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्मृती ईराणी म्हणाल्या, 'ज्या लोकांना आझादी पाहिजे, जे भारताचे तुकडे करण्याची भाषा करतात, ज्यांनी जेएनयुला राजकीय अड्डा बनवलाय अशा लोकांसोबत दीपिकाने आपली सहानुभूती दाखवली आहे. त्यामुळे आम्हाला आक्षेप आहे. दीपिका ही काँग्रेसची समर्थक असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. हा आरोप करताना त्यांनी 2011मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत म्हणून सांगितले होते याची आठवण करून दिली.

मध्यमवर्गीयांना बजेट बिघडणार; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ

तत्पूर्वी, दीपिकाचा 'छपाक' आज (ता. १०) देशभर रिलीज झाला. मात्र तिच्या जेएनयूमध्ये जाण्यावरून सुरू झालेला वाद काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोशल मीडियावरून भाजप समर्थकांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे, 'छपाक'वर बहिष्कार घाला अशी मागणी करण्यात आली आहे. तर, काही जणांकडून दीपिकाचे कौतुकही केले गेले. भाजपने दीपिकावर टीका केलेली तर विरोधीपक्षांनी तिच्या या कृत्याला पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला.

जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

दरम्यान, काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'ला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घोषित केलेला असताना महाराष्ट्रातही छपाक टॅक्स फ्री करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवरही आता राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसशसाशित प्रदेशांनी छपाक टॅक्स फ्री केल्याने भाजपकडून यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika stood with tukde-tukde gang says Union Minister Smriti Irani