दिल्ली : राजधानीतील 'मजनू का टीला' परिसर मंगळवारी एका भयावह दुहेरी हत्याकांडाने (Delhi Crime News) हादरला. या प्रकरणातील आरोपी निखिल कुमार (२३) याला बुधवारी उत्तराखंडच्या हल्द्वानी येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर आरोप आहे, की त्याने आपल्या EX लिव्ह-इन पार्टनर सोनल आर्य (२२) आणि तिच्या मैत्रिणीच्या सहा महिन्यांच्या बाळाची गळा चिरून निर्घृण (Ex-Girlfriend Killed) हत्या केली.