Liquor Shops Closed for 5 Days
esakal
लागोपाट येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवस मद्याची दुकानं बंद राहणार आहेत. दिल्ली सरकराने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिसुचना काढण्यात आली असून पाच दिवस ड्रायडे घोषित करण्यात आला आहे. २६ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान पाच दिवस दिल्लीत मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी असेल, असं उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलं आहे.