
Earthquake Jolts Delhi-NCR : सोमवारी पहाटे राजधानी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळील धौला कुआ येथे जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे ५:३६ वाजता दरम्यान ही भूकंपाची घटना घडली.