esakal | Delhi Elections:काँग्रेसला भोपळा, भाजपच्या जागा वाढण्याची चिन्हं
sakal

बोलून बातमी शोधा

delhi election 2020 congress bjp may lose

काँग्रेसनं ताकद लावली असती तर, भाजपला मतविभाजनाचा फायदा झाला असता. हा अंदाज आल्यामुळचं काँग्रेस निवडणुकीत फारशी दिसली नाही.

Delhi Elections:काँग्रेसला भोपळा, भाजपच्या जागा वाढण्याची चिन्हं

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिरंगी, दुरंगी म्हणता म्हणता, निवडणूक एकतर्फीच झाल्याचं स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष अर्थात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीच जादू असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपनं संपूर्ण शक्ती पणाला लावूनही त्यांना माफक यश मिळालंय. तर, निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान केलेल्या काँग्रेसला अपेक्षेप्रमाणं भोपळा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसनं ताकद लावलीच नाही!
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं सुरुवातीपासूनच ताकद लावलेली नव्हती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या काही सभा झाल्या. त्यातली त्यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावरची टीका चर्चेत राहिली. हा अपवाद वगळता काँग्रेस दिल्लीच्या निवडणुकीत कोठेही दिसली नाही. निवडणुकीत सुरुवातीपासून आपला संधी असल्याचं दिसल्यामुळं काँग्रेसनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिल्लीच्या निवडणुकीतून अंग काढून घेतल्याचं बोललं जातंय. काँग्रेसनं ताकद लावली असती तर, भाजपला मतविभाजनाचा फायदा झाला असता. हा अंदाज आल्यामुळचं काँग्रेस निवडणुकीत फारशी दिसली नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आणखी वाचा - आपचा विजय निश्चित, कार्यालय सजलं

भाजपनं शक्ती लावली पणाला
दुसरीकडं भाजपनं मात्र दिल्लीत जोरदार ताकद लावली. इतर राज्यांमधील मुख्यमंत्री, मोठे नेते, केंद्रीय मंत्री अशी जवळपास 400 नेत्यांची फौज भाजपनं दिल्लीच्या मैदानात उतरवली होती. महाराष्ट्रातून देवेंद्र फडवणीस, रावसाहेब दानवे, नितीन गडकरी यांसारखे नेते दिल्लीच्या प्रचारात उतरले होते. पण, एवढी ताकद लावूनही भाजपला अपेक्षेप्रमाणं यश मिळत नसल्याचं दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सत्तांतर होईल, असा दावा केला होता. पण, तशी परिस्थिती सकाळच्या टप्प्यातील मतमोजणीत दिसलेली नाही. 

loading image