काँग्रेसला झटका; माजी खासदाराच्या मुलाचा आपमध्ये प्रवेश

वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

दिल्लीत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरवात झाली असतानाच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरवात झाली असतानाच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस पक्षाचे माजी खासदार महाबल मिश्रा यांचा मुलगा विनय मिश्रा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत, दिल्लीचे बदरपुरमधून राम सिंह, गांधी नगरमधून जीतू चौधरी यांनीही केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मटियामहल विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते शोएब इकबाल यांनी गुरुवारी आपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांचा मुलगा आले इकबाल यांनीही 'आप'मध्ये प्रवेश केला होता. त्यासोबतच, दिल्ली युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष जगदीश यादव यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.

आगामी विधानसभा निडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची स्थिती दिल्लीमध्ये चिंताजनक असतानाच काँग्रेस पक्षाला एकामागून एक झटके बसत असल्याचे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षातच थेट होईल असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Delhi Election 2020 दिल्ली विधानसभा निवडणूक 2020


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Election 2020 son of former Congress MP Mahabal Mishra joins AAP